Home » आखाती देशातील युद्धाचा परिणाम! कच्च्या तेलाच्या किंमती $100 पार

आखाती देशातील युद्धाचा परिणाम! कच्च्या तेलाच्या किंमती $100 पार

१० दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक बाजारावर परिणाम

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या प्रति बॅरल कच्च्या तेलाची किंमत 100 डॉलरच्या पुढे गेली असून याचा परिणाम अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर दिसू लागला आहे.

सध्या या युद्धाचा आज दहावा दिवस आहे आणि त्याचे पडसाद जागतिक संसाधनांवर उमटत आहेत. विशेषतः इराणवरील हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या बाजारावर सर्वाधिक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या आठवड्यापेक्षा 8% वाढ

गेल्या आठवड्याच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सुमारे 8 टक्क्यांची वाढ झाली आहे.

  • ब्रेंट क्रूड ऑईल ची किंमत सध्या सुमारे 102.50 डॉलर प्रति बॅरल झाली आहे.
  • तर WTI क्रूड ऑईल ची किंमत 101.20 डॉलर प्रति बॅरल वर पोहोचली आहे.

हार्मोस समुद्रधुनीतील अडथळा

या किंमतवाढीमागे सर्वात मोठे कारण म्हणजे हार्मोसची समुद्रधुनी (Strait of Hormuz). जागतिक तेल पुरवठ्याच्या सुमारे 20 टक्के पुरवठा या मार्गाने होतो. या मार्गावर निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.

याच कारणामुळे शिपिंग खर्चामध्ये सुमारे 30 टक्क्यांची वाढ झाल्याचेही सांगितले जात आहे.

चीनकडे जाणाऱ्या जहाजांना परवानगी

सध्या इराणने या समुद्रधुनीमधून केवळ चीनकडे जाणाऱ्या जहाजांना चालू ठेवले आहे, तर इतर अनेक जहाजांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे.

जगभरात परिणाम

या परिस्थितीचा परिणाम केवळ आखाती देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तेलाच्या किंमती वाढल्यामुळे त्याचा फटका जगभरातील इंधन दर, वाहतूक खर्च आणि अर्थव्यवस्थांवर बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, शिक्षण आणि टेक अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचा WhatsApp Channel Follow करा!

Whatsapp channel
error: Content is protected !!