अहिल्यानगरमध्ये गॅस तुटवडा; कालभैरवनाथ देवस्थानात 5000 भाविकांसाठी चुलीवर महाप्रसाद
अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा परिणाम अनेक ठिकाणी जाणवू लागला आहे. विशेषतः देवस्थानांच्या प्रसादालयांवर याचा मोठा परिणाम होत आहे. आगडगाव येथील श्रीक्षेत्र कालभैरवनाथ देवस्थानामध्ये दर रविवारी हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मात्र गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे देवस्थान प्रशासनाने आता पर्यायी व्यवस्था म्हणून चुलीवर महाप्रसाद बनवण्यास सुरुवात केली आहे.मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे गॅस…
